बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णींच्या मुलाला अटक
डी एस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला पुण्यात अटक करण्यात आली.
पुणे : ठेवीदारांची फसवणूक केल्याप्रकरणी अटकेत असलेले बांधकाम व्यावसायिक डी एस कुलकर्णी यांचा मुलगा शिरीष कुलकर्णी याला पुण्यात अटक करण्यात आली. शिरीष कुलकर्णीला २ जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांच्या कोर्टाने हा आदेश दिला. सुप्रीम कोर्टाने शिरीष कुलकर्णीला आठ दिवसांच्या आत कोर्टापुढे हजर राहण्याचा आदेश दिला होता.