अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई :  चोर कितना भी शातिर हो पकडा ही जाता है.... हे वाक्य मुंबईच्या घाटकोपर पोलिसांनी(Ghatkopar police) सिद्ध करु दाखवले आहे. मुंबईच्या घाटकोपर येथे राहणाऱ्या व्यक्तीची कार चोरुन राजस्थानला(Rajasthan) फरार झालेल्या चोरट्यांना पोलिसांनी जेरबंद केले आहे. काहीच पुरावे नसताना मोठ्या शिताफीने आणि संयमाने तपास करत पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळ्यल्या आहेत. झुम कार अॅपवर(Zoom app) कार बुक करून त्या विकणारी टोळी पंतनगर पोलिसांच्या हाती लागली आहे. पोलिसांच्या या कारगिरीचे सर्वत्रच कौतुक 


कार चोरुन राजस्थानमध्ये विकायचे


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी झुम कार अॅप वरून  कार बुक करून या कार चोरी करत यांची  राजस्थानमध्ये विक्री करत होते. घाटकोपरच्या पंतनगर पोलिसांनी  या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
दिनेश कुमार मालाराम गोयत आणि सुरेश कुमार मोहनलाल पंडित अशी अटक आरोपींची नावे आहेत. तर बनवारीलाल ऊर्फ पंडित रहाणार हा आरोपी फरार आहे. हे सर्व आरोपी राजस्थान चे रहिवासी आहेत. 


घाटकोपर येथे रहाणारे संदीप शेलार यांची  होंडाई क्रियेटा कार आरोपींनी महिन्याभरपूर्वी  झुम अॅपवरुन बुक केली होती. कार ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी जीपीएम सिस्टम बंद करून, मोबाईल फोन बंद केला. यानंतर ते कार घेऊन पसार झाले.
शेलार यांनी त्यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही. अखेरीस त्यांनी पंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह उत्तराखंड, गुजरात तसेच इतर राज्यांतील पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. या आरोपीचे मोबाईल लोकेशन पोलिस दररोज चेक करत होते. त्यानुसार आरोपींचा वावर कुठे असू शकतो याचा पोलिसांनी अभ्यास केला.  


त्यांचे अधिकाअधिक लोकेशन अजमेर जवळ दिसले. यानंतर पोलिसांनी राजस्थानच्या चितळवाडा पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. घाटकोपर पोलिसांनी थेट राजस्थानमध्ये जाऊन आरोपींना अटक केली.  ही टोळी नोकरीच्या शोधात असेलल्या ड्रायव्हर यांना नोकरीचे अमिश दाखवत त्यांचे आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स मागून घेत. त्यांच्या नावे खोटे ईमेल आयडी तयार करून झूम कार ॲप वर बिना चालक वाहन भाड्याने घेत. 


स्वतःचा फोटो सेल्फी काढून ते वाहन भाड्याने घेऊन जात. राजस्थानमध्ये पोहोचल्यानंतर वाहनांमधील जीपीएस सिस्टीम काढून टाकत. यानंतर चोरी केलेली वाहने ते राजस्थान मधील काही जिल्ह्यांमध्ये विक्री करत असत. 
या आरोपींविरोधामध्ये मुंबई शहर , मुंबई उपनगर ठाणे , शहर गुजरात, राज्य दिल्ली या ठिकाणी अनेक तक्रार दाखल आहेत.