अहमदनगर : अहमदनगरमध्ये पोटनिवडणुकीच्या निकालाच्या दिवशी झालेल्या हिंसाचारात २ शिवसैनिकांवर गोळीबार झाला, धारदार शस्त्राने वार झाला, यात त्यांचा मृत्यू झाला. येथे शिवसेना विरूद्ध तीनही राजकीय पक्ष एकत्र लढत होते. भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस असे सर्व पक्ष शिवसेनेला रोखण्यासाठी काम करत होते, भाजपने आपला उमेदवार नावापुरता उभा केला होता, आणि भाजपचे पदाधिकारी काँग्रेससाठी काम करत होते, असा धक्कादायक आरोप शिवसेना नेते रामदास कदम यांनी केला आहे. 


रामदास कदम यांनी केला आरोप


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रामदास कदम यांनी आरोप करताना आणखी एक धक्कादायक माहिती दिली. रामदास कदम म्हणाले या पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला फक्त १५३ मतं मिळाली आहेत. भाजप युतीच्या नावाखाली इतर पक्षांना साथ देत असल्याचं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. 


गुंडगिरी पोलिसांच्या संगनमताने-कदम


नगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे, आपण मुख्यमंत्र्यांना उद्या या विषयावर भेटून त्यांच्याशी चर्चा करणार असल्याचं शिवसेना नेते रामदास कदम यांनी म्हटलं आहे. तसेच ही गुंडगिरी पोलिसांच्या संगनमताने झाली असल्याचंही रामदास कदम यांनी आपल्या आरोपात म्हटलं आहे.