जालना : दुचाकी केबलमध्ये अडकल्यानंतर रस्त्यावर कोसळलेल्या महिलेला बसनं चिरल्याची घटना जालाना रोडवरील रामनगर भागात घडली आहे. या अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे. हा अपघात इतका भयानक होता की सामान्य नागरिक यामधून सावरलेले नाहीत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ललिता शंकर ढगे असे अपघातातील मृत महिलेचे नाव आहे. पतीला कामावर सोडल्यानंतर जीमला जाणाऱ्या महिलेची दुचाकी रस्तावरली केबलमध्ये अडकली. गाडी अडकल्यानं महिलेचा तोल गेला आणि पाठीमागून आलेल्या बसनं त्यांना चिरडलं. सह्याद्री हॉस्पीटलसमोर सध्या इंटरनेट केबलचे काम सुरू असून, याचा नागरिकांना त्रास होतोय. या केबलमुळं आज एकाचा जीव गेल्यानं संताप्त व्यक्त केला जात आहे. 


योगा क्लाससाठी ललिता ढगे दुचाकीवरून जात असताना केबलमध्ये अडकून दुचाकीवरून खाली पडल्या. यानंतर मागून येणाऱ्या खासगी कंपनीच्या बसने महिलेला चिरडलं आहे. शनिवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही घटना सह्याद्री रूग्णालयासमोर घडली आहे.


या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृत ललिता यांना घाटी रूग्णालयात दाखल केले. ललिता यांच्या मागे पती, मुलगी आणि मुलगा आहे. अपघातानंतर बसचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात बसचालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.