विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद : विधानसभा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात रंगतदार झाला आहे. थोड्याच वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यासाठी जसा सोशल मीडियाचा वापर होतो, तसा गाणी बनवण्याचंही फॅड चांगलंच सुरु झालं आहे. उमेदवारांच वा पक्षाचं गुण गौरव कऱणारी गाणी निवडणूक काळात बाजारात धुम करताय. कार्यकर्त्यांना उत्साह आणणा-या गाण्यांची आता चांगलीच डिमांड वाढली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मौसम निवडणुकांचा आहे. माहौल प्रचाराचा आहे आणि या प्रचारात रंगत आणत आहेत ते विविध पक्षांनी आणि उमेदवारांनी तयार केलेली गाणी.


अनेक ठिकाणी स्थानिक उमेदवारही मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी गाण्यांची मदत घेत आहेत. अशा प्रचारगीतांसाठी औरंगाबाद, जालना, नगर, नांदेड, बुलढाण्यापासून उमेदवारांनी औरंगाबादेत गर्दी केली आहे. त्यामुळे लेखकांना आणि गायकांनाही निवडणुकीच्या काळात अच्छे दिन आले आहेत.