रत्नागिरी :  राजापूर तालुक्यातील कशेळी गावात समुद्र किनारी गेल्या १५ दिवसांपूर्वी एक कॅप्सुल सारखी दिसणारी वस्तु वाहत आली होती, जागृत नागरिकांनी या वस्तुबाबत पोलिसांना माहिती देखील दिली होती ही वस्तु पहिल्यांदा समुद्रात होती मात्र लाटांच्या मा-यामुळे आता ही वस्तु समुद्र किना-यावर आलीय. 


मात्र किना-याला वस्तु लागून देखील पोलीस यंत्रणेने याबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. याबाबत आता स्थानिकांनी थेट जिल्हाधिकारी यांच्याकडेच तक्रार केलीय त्यामुळे आता तरी शासकीय यंत्रणा हलेल अशीच अपेक्षा आहे.