जळगाव : आजचा दिवस अपघात दिवस ठरलाय. नांदेडमध्ये वऱ्हाडाला घेऊन जाणाऱ्या ट्रेम्पोला अपघात होऊन ११ जण जागीच ठार झालेत तर दुसरीकडे जळगावमध्ये लग्नसमारंभ आटोपून येणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच जणांचा अपघाती मृत्यू झालाय. 


एकाच कुटुंबातील पाच ठार 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जळगावमध्ये पारोळ्याजवळील तळवेल गावाजवळ भीषण अपघात झालाय... या अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झालाय... हे सर्व जण पाचोऱ्यातील वाणी कुटुंबातील आहेत.. धुळ्यातून लग्नसमारंभ आटोपून परतत असताना  पारोळाजवळ त्यांच्या मारुती इको गाडीला ट्रकची धडक बसली.. यात बंडू वाणी, त्यांची पत्नी, त्यांची आई, रमेश वाणी आणि वाहन चालक चेतन महाजन या पाच जणांचा या अपघातात मृत्यू झालाय... तर चार जण गंभीर जखमी झालेत.


वऱ्हाडाचा टेम्पो आणि टँकरची धडक, ११ ठार 


नांदेड : लग्नाचं व-हाड घेऊन जाणारा टेम्पो आणि टँकरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ११ जण ठार तर १५ जण गंभीत जखमी झाले. नांदेड लातूर रोडवरील मुखेड तालुक्यातील जांब गावाजवळ हा भीषण अपघात घडला. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातील खरोसा येथील लग्नाचं व-हाड मुखेडकडे विवाह सोहळ्यासाठी येत होते... मुखेड तालुक्यातील जांब जवळ येताच टँकर आणि टेम्पोमध्ये समोरासमोर धडक झाली... टेम्पो वऱ्हाडींनी खचाखच भरून होता... या भीषण अपघातात जागेवरच नऊ जणांचा मृत्यु झाला तर मुखेड रुग्णालयात येताना आणखी दोघांचा मृत्यु झाला. 


अपघातात आणखी १५ जण गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचार करुण त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडला हलवण्यात आलंय. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांची संख्या अधिक आहे. मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे.