सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे: सध्या अपघाताच्या घटना वारंवार घडताना दिसत आहेत. मुंबई-पुणे एक्सप्रेस हायवे (Mumbai - Pune Expressway) तर अशा अपघातांच्या अनेक घटना नोंदवल्या जातात. सध्या अशाच एका अपघात घटनेनं पुन्हा एकदा चर्चांना उधाण (Traffic Today in Mumbai - Pune Expressway) आलं आहे. सिंहगड रस्त्यावरील गोऱ्हे बुद्रुक गावच्या हद्दीत संत धर्माजी महाराज मंदिरापासून काही अंतरावर पुलाच्या कठड्याला धडकून कारचा भिषण अपघात झाला आहे. अपघाताची तीव्रता एवढी होती की कारची पुढची दोन्ही चाके, इंजिन व इतर भाग तूटून बाजूला पडले होते.सुदैवाने एअरबॅग (Airbag) उघडल्याने जीवीत हानी झालेली नाही. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. (car accident near Gorhe village marathi crime news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

डोणजे बाजूकडून पुण्याकडे येत असताना हा अपघात झाल्याचे दिसून येत असून अपघाताच्या अगोदर सुमारे चाळीस ते पन्नास मीटर अंतरापासून कार मुख्य रस्ता सोडून बाजूने येऊन पुलाच्या सिमेंट (Cement) कॉंक्रिटच्या कठड्याला जोरात धडकली आहे. अपघाताचा आवाज ऐकून जवळच असलेल्या हॉटेलचे सुरक्षारक्षक (Security Guards) मदतीसाठी धावले. सुरक्षारक्षकांनी गाडीत अडकलेल्या एकाची सुखरूप सुटका केली. रविवार असल्याने सकाळपासूनच (Sunday Morning) पर्यटकांच्या वाहनांची वर्दळ सुरू आहे. 


हेही वाचा - पुण्याच्या तरूणीने स्वत:च्याच अपहरणाचा रचला डाव, कारण एकूण धक्काच बसेल


येणारी-जाणारी वाहने थांबवून नागरिक अपघातस्थळी पाहण्यासाठी गर्दी करत होते. कारची अवस्था पाहून नागरिक अपघाताच्या तीव्रतेबाबत चर्चा करताना दिसत होते. सुदैवाने एअरबॅग उघडल्याने व सुरक्षारक्षक वेळीच मदतीसाठी धावल्याने या अपघातात जीवीत हानी झालेली नाही. 


कार आणि गाडी पार्कला लावली अन् - 


हेही वाचा - Maharashtra : राज्यात येथे सापडलाय सोन्याचा खजिना, यातून झाला मोठा उलगडा


मार्केट समोर पार्क केलेल्या वाहनाना अचानक आग लागून एक कर आणि एक दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. नांदेड शहरात ही घटना घडली. नांदेड (Nanded) मधील महावीर चौकातील संतकृपा मार्केट समोर रात्री वाहने पार्क करण्यात आली होती. सकाळी अचानकपणे या वाहनांना आग लागल्याचे दिसून आले. आग लवकर पसरली. आगीत एक कार आणि मोटारसायकल जळून खाक झाली. या घटनेने वाहनमालकांचे मोठे नुकसान झाले. मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. अज्ञात व्यक्तींनी आग लावली का याचा शोध पोलीस घेत आहेत.