अमरावती : नागपूर-अमरावती महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात सात जण ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले. दरम्यान, या कार अपघाताचा शेवटचा व्हिडिओ इन्स्टावर अपलोड करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत  आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या कार अपघातात ठार झालेले सर्व तरुण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत. नागपूरकडे येताना वडधामना शहंशाह हॉटेलजवळ या विद्यार्थ्यांच्या कारची धडक झाली आणि सर्व जण जागीच ठार झाले. मृतांमधील एक तरुणी नागपुरातील एका पोलीस अधिकाऱ्याची मुलगी आहे.