Beed Accident : कार आणि दुचाकीचा भीषण अपघात, तिघांचा जागीच मृत्यू
Beed Accident News : बीडमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. (Beed Accident ) या अपघातात तीन तरूण जागीच ठार झालेत. माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर हा अपघात झाला.
Beed Car Bike Accident : बीडमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला आहे. (Beed Accident ) या अपघातात तीन तरूण जागीच ठार झालेत. माजलगाव ते तेलगाव रस्त्यावर हा अपघात झाला. मृत तिन्हीही तरूण लहामेवाडी इथले रहिवासी होते. रात्री तेलगाव इथलं काम उरकून ते घरी निघाले होते. शिंदेवाडी इथं त्याच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिली. त्यांना तातडीने माजलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
माजलगाव-तेलगाव मार्गावर कार आणि दुचाकीची झालेल्या समोरासमोर धडक झाली. या मार्गावर बुधवारी संध्याकाळी झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. (Beed accident) तीन तरुण कापूस जिनिंगवर काम करत होते. लक्ष्मण सुभाष कापसे (32), नितीन भाऊसाहेब हुलगे (30) आणि आण्णासाहेब बळीराम खटके अशी मृतांची नावे असून तिघेही लहामेवाडी गावातील तरुण होते.
हे तरुण कापूस जिनिंगमध्ये काम करत होते. ते दररोज दुचाकीने कामाला ये जा करीत असत. रात्री कामावरुन परत असताना त्यांच्या दुचाकीला विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारने धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. एकाच गावातील तीन तरुणांचा अपघात मृत्यू झाल्यामुळे माजलगाव तालुक्यासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.