रत्नागिरी : रत्नागिरीमध्ये शनिवारी रात्री 'द बर्निंग कार'चा थरार पाहायला मिळाला. शनिवारी रात्री 8.30 ते 8.45 च्या दरम्यान ही घटना घडली. एका चालत्या क्वालिस गाडीने अचानक पेट घेतला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रत्नागिरी शहरातल्या खालची आळी इथं सोहम गार्डन समोरील रस्त्यावर ही घटना घडली. घटनेची माहिती नगर परिषदेच्या अग्निशमन विभागाला देण्यात आल्यानंतर नगरपालिकेचा बंब घटनास्थळी लगेचच दाखल झाला. आणि आगीवर नियंत्रण आणण्यात आलं. 


सुदैवाने या घटनेमध्ये कोणीही जखमी झालं नाही. दरम्यान गाडीत शॉर्टसर्किट झाल्याने गाडीने पेट घेतल्याचं बोललं जातंय.