वसई : वसईतील एका तरुण तरुणीला मौज मजेसाठी कळंब समुद्र किनाऱ्यावर फिरण्याचा उत्साह चांगलाच अंगलट आला आहे.  मंगळवारी सायंकाळी हे तरुण तरुणी फिरण्यासाठी आपली स्विफ्ट कार घेऊन  समुद्र किनाऱ्यावर गेले होते. रात्रीच्या  वेळी त्याच ठिकाणी थांबण्याचा बेत त्यांनी आखल्याने त्यांनी आपली कार किनाऱ्यावरच  पार्क केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सकाळी आपली चारचाकी जागेवर नसल्याचे पहिले असता ती चारचाकी समुद्राच्या पाण्यात वाहत जाऊन भुईगाव किनाऱ्यावर जाऊन अडकल्याचे दिसून आले. त्यानंतर याबाबत तात्काळ वसई पोलिसांना, अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. 



मागील २० तासांहून अधिक वेळ ही चारचाकी समुद्रात ५०० मीटर अंतरावर असून तिला काढण्याचे प्रयत्न सध्या सुरु आहेत. मात्र ढवळत असलेल्या समुद्राच्या पाण्यामुळे कार बाहेर काढणे जिकिरीचे होत आहे.