ठाणे : पीएमसी बँक बुडाल्याची घटना ताजी असताना गुडवीन ज्वेलर्सने ग्राहकांना पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांना गंडा घातला आहे. गुडवीनच्या दुकानाना टाळे लागले आहे. मात्र ज्यांनी त्याच्याकडे पैसा गुंतविला होता. त्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी मोठ-मोठ्या रकमा गुंतविल्याचे पुढे आले आहे. कोणाचे शिक्षणासाठीचे पैसे आहेत. कोणाचा आजारासाठी उपचारावरील पैसा आहे. काहींनी तर निवृत्तीची सगळी रक्कम गुंतविल्याने त्यांनी डोक्याला हात लावला आहे. दरम्यान, डोंबवली येथील ज्वेलरी स्टोअर चैनचा मालकाने कोट्यवधी रुपये घेऊन पलायन केले आहे. पोलिसांनी ज्वेलरी स्टोअरच्या मालकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुडविन ज्वेलर्सविरूद्ध आम्ही गुन्हा दाखल केला आहे. सुमारे ३०० लोक आमच्याकडे आले आणि त्यांनी स्टोअरच्या डोंबवली शाखेत केलेल्या कथित फसवणुकीबद्दल तक्रार केली. सुमारे १० कोटींची फसवणूक झाली असल्याचं सांगण्यात येत आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. आम्ही ही शाखा सील केली आहे, अशी माहिती डोंबिवली पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश यांनी दिली.


सुनील नायर आणि सुधीर नायर या ज्वेलरी स्टोअर चैनचे मालक आहेत. गुडविन ज्वेलर्सच्या डोंबिवली शाखेसमोर ग्राहकांनी निदर्शने केली. दिवाळीच्या काही दिवस आधी हे शोरूम उघडेल गेले होते. मात्र, ऐन दिवाळीत दुकानाच्या बाहेर एक पाटील लावण्यात आली होती. दुकाने दोन दिवस बंद राहणार आहे. दरम्यान, लोकांनी पैस मागितले असता त्यांनी पैसे नसल्याचे सांगून नकार दर्शविला. या स्टोअरमध्ये सुमारे ५०० लोकांनी पैसे गुंतवले आहेत, अशी माहिती काही ग्राहकांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिली.



आणखी एक गुंतवणूकदार थॉमस म्हणाले, मी येथे दोन लाख रुपयांची स्थिर ठेव केली. त्याच्या वचनानुसार मी माझे सोने घेण्यासाठी स्टोअरमध्ये आलो पण ते बंद होते. यानंतर सुमारे ३०० लोक जमा झाले आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.


दरम्यान, गुंतवणूकदारांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे मालक आणि मॅनेजरविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. यानंतर त्यांच्या शोधासाठी त्यांच्या घरीही पोलीस धडकले. त्यावेळी धक्कादायक बाब पुढे आली. हे सगळे काही दिवसांआधीच राहते घर रिकामे करून परिवारासह गायब झाले होते. त्यामुळे हा फसवणुकीचा पूर्विनयोजित कट होता का, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.