स्वाती नाईक, झी मीडिया, नवी मुंबई : मराठी अभिनेत्री केतकी चितळेच्या (Marathi Actress Ketaki Chitale) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुखे शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर विरोधात केलेल्या वादग्रस्त पोस्टबद्दल तिच्याविरोधात आणखी एका ठिकाणी आता गुन्हा दाखल झाला आहे. (case registered against ketki chitale at nerul police station for posting controversial fb post against sharad pawar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केतकी विरोधात नवी मुंबईतील नेरुळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला गेला आहे. राष्ट्रवादीच्या नेरळ तालुका महिलाध्यक्ष सुमित्रा पवार यांनी पोलिसांना केतकी विरोधात तक्रार दिली होती. या तक्रारीवरुन केतकीवर गुन्हा दाखल केला आहे. केतकीवर याआधी कळवा आणि धुळ्यातही गुन्हा दाखल करण्यात आलाय.  


केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी 


दरम्यान केतकीला 18 मे पर्यंत पोलीस कोठडी रहावं लागणार आहे. शनिवारी केतकीला अटक करण्यात आली. त्यानंतर आज केतकीला ठाणे न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयात दोन्ही बाजूने युक्तीवाद झाला. केतकीने वकील घेतला नव्हता. केतकीने स्वत:ची बाजू मांडली. यावेळेस ठाणे न्यायालयाचे न्यायाधीश वी. वी. राव-जडेजा यांनी 18 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली.