पुणे : Buffalo Attack : शहरातील कॅम्प परिसरातील अशी एक थरारक घटना घडली आहे की, अंगावर काटा उभा राहतो. व्हिडिओ पाहताना तुम्हाला धक्का बसेल, असेच हे दृश्य आहे. म्हैस अचानक उधळली आणि थेट दोन दुचाकींना अशी काही धडक दिली की रस्त्यातच दुचाकीसह स्वार आणि पती-पत्नी खाली कोसळलेत. ही घटना अचानक झाल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. ( Buffalo Attack Two Bikers in Pune)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हैस अचानक उधळल्याने रस्त्यावरुन जाणाऱ्या दुचाकीला थेट जाऊन धडकली.या घटनेत दुचाकीवरील पती-पत्नी जखमी झालेत. दरम्यान, संबंधित म्हशीच्या मालकाविरोधात लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आले आहे.


दुचाकी चालक जुबेर शेख हे पत्नीसोबत जात असताना वरशी मस्जिद जवळ बी घडली घटना. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली आहे. पाहा हा व्हिडिओ..