Assembly Election Date Announcement : केंद्रीय निवडणूक आयोगाने जम्मू काश्मीर आणि हरियाणामधील विधानसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. निवडणूक आयोगाचे प्रमुख राजीव कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी या दोन राज्याच्या मदतानाच्या तारखा आणि निकालाची तारीख देखील जाहीर केली आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 18 सप्टेंबर, 25 सप्टेंबर आणि 1 ऑक्टोबरला तीन टप्प्यांत मतदान होणार आहे. तर 4 ऑक्टोबरला निकाल जाहीर होईल. तर हरियाणात 1 ऑक्टोबरला एकाच टप्प्यात मतदान होणार असून येथंही 4 ऑक्टोबरला निकाल लागणार आहे.


दोन्ही राज्याची आकडेवारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणात 90 मतदारसंघ आहेत. येथे 2.01 कोटी मतदार असतील. त्यापैकी 10,321 मतदार शताब्दी झाले आहेत. हरियाणात 10,495 ठिकाणी 20,629 मतदान केंद्रे असतील. मतदारांची सरासरी संख्या मतदान केंद्र 977 असेल. तर जम्मू-काश्मीरमध्ये 90 मतदारसंघ आहेत. येथे 87.09 लाख मतदार आहेत. यामध्ये 44.46 लाख पुरुष आणि 42.63 लाख महिला मतदार असतील. येथे पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांची संख्या 3.71  लाख असेल. तसेच एकूण 20 लाखांहून अधिक तरुण मतदार असतील.




जम्मू-काश्मीरमधील नामांकनाची अंतिम तारीख 27 ऑगस्ट असेल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 30 ऑगस्ट असेल. 18 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तेथील मतदान केंद्रांवरील लांबच लांब रांगा लोकशाहीच्या सामर्थ्याचे उत्तम उदाहरण देतात. घाटीने हिंसाचार नाकारला आणि गोळ्या आणि बहिष्कारांऐवजी मतपत्रिकेची निवड केली. प्रत्येक नागरिकाला पूर्ण संधी मिळावी म्हणून काश्मिरी स्थलांतरितांसाठी स्वतंत्र विशेष व्यवस्था करण्यात आली होती, असं राजीव कुमार यांनी म्हटलं आहे.