पुणे : आकाशवाणीच्या निवेदिका सुधा नरवणे यांचे पूत्र मूळचे पुणेकर असलेल्या लेफ्टनंट जनरल मनोज नरवणे यांची देशाच्या लष्कर प्रमुख पदी नियुक्ती होणार आहे. जनरल नरवणे पुण्यातील ज्ञानप्रबोधिनीचे माजी विद्यार्थी आहेत. त्यामुळे ज्ञानप्रबोधिनीचा आनंद गगनात मावत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या ज्ञान प्रबोधिनीमध्ये आनंदोत्सव साजरा होतो संस्थेचे माजी विद्यार्थी मनोज नरवणे देशाच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्त झाल्याचा आनंद इथल्या सगळ्यांनाच वाटतो आहे. ज्ञानप्रबोधिनीतून पास आउट झालेल्या नरवणे यांनी पुण्यातील एनडीए तसेच डेहराडूनच्या इंडियन मिलिटरी अकादमीतून लष्करी प्रशिक्षण घेतलं. अनेक मोहिमांमध्ये त्यांनी आपलं शौर्य तसेच नेतृत्व सिद्ध केलं. आता 31 डिसेंबर रोजी ते लष्कर प्रमुखपदाची सूत्र हाती घेणार आहेत. ही बातमी मिळताच मित्र परिवाराचा आनंद गगनात मावत नाहीए.


राष्ट्रभक्ती तसंच राष्ट्र सेवेची कास धरणारी पिढी घडविण्याचं काम ज्ञानप्रबोधिनीच्या माध्यमातून अविरतपणे सुरू आहे. मनोज नरवणे हे त्याचंचं उदाहरण आहेत. इथल्या माजी विद्यार्थ्यांसाठी देखील ही बाब अभिमानास्पद अशी आहे.


ज्ञानप्रबोधिनीचा यंदा सुवर्ण महोत्सव असून 22 डिसेंबरला होणाऱ्या या कार्यक्रमात मनोज नरवणे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. जनरल अरुणकुमार वैद्य यांच्यानंतर लष्कर प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे नरवणे हे दुसरे मराठी अधिकारी ठरता आहेत. याचा सार्थ अभिमान ज्ञानप्रबोधिनी संस्थेला आहे.