Amit Shah in Mumbai: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आजपासून दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. अमित शाह आज संध्याकाळी मुंबईत दाखल होणार आहेत. यानंतर मुख्यंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याशी आगामी निवडणुकीबद्दल ते चर्चा करणार आहेत. याशिवाय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंसह (Chandrashekhar Bavankule) सुकाणू समिती सदस्यांची स्वतंत्र बैठकही होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमित शाह शनिवारी संध्याकाळी मुंबईत पोहोचल्यानंर सह्याद्री अतिथीगृहावर मुक्काम करणार आहेत. दरम्यान रविवारी अमित शाह नवी मुंबईत असणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांना महाराष्ट्रभूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार दिला जाणार आहे. या कार्यक्रमानंतर ते पुन्हा एकदा पक्षाचे नेते, खासदार यांच्याशी चर्चा करतील. यानंतर ते गोव्याला रवाना होतील. 


महाराष्ट्रातील आगामी निवडणुकांच्या दृष्टीने अमित शाह यांचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. 


असा असेल अमित शाह यांचा दौरा - 


शनिवारी सायंकाळी 7.30 वाजाता - सह्याद्री अतिथीगृह येथे आगमन 
भाजपच्या महत्वाच्या नेत्यांसोबत अमित शहांची बैठक


बैठकीत अमित शहा घेणार मिशन 45 आणि मुंबई महानगर पालिका निवडणुकीचा आढावा घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीला अवघे वर्ष उरले असताना राज्यात काय वातावरण आहे याच सोबत मुंबई महानगर पालिका निवडणुका लागल्या तर मुंबईत भाजपची काय स्थिती आहे याचा आढावा देखील अमित शहा या बैठकीत घेणार असल्याची माहिती आहे. 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला यंदा 350 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने राज्य सरकारकडून शिवराज्याभिषेक सोहळा भव्यदिव्य साजरा केला जाणार आहे. यासाठी जगदंबा तलवार ब्रिटिश सरकार कडून घेऊन आणण्यासंबंधीही चर्चा होणार आहे. 



- रविवारी सकाळी 11 वाजता हेलिकॉप्टरने खारघरसाठी रवाना


- 12 वाजता अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रम 


- त्यानंतर 1 ते 1.30 भोजन 


- 3 वाजता मुंबईहुन गोव्याच्या दिशेने रवाना होतील



दरम्यान अमित शाह यांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत बदल करण्यात आले असून हार्बर मार्गावरील मेगाब्लॉकही रद्द करण्यात आला आहे. 


रस्ते वाहतुकीत बदल - 


पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर आज दुपारी 2 वाजल्यापासून उद्या रात्री 11 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असेल. ज्येष्ठ निरूपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना खारघरमध्ये महाराष्ट्र भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी राज्यभरातून लोकं येणार आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळायला हा निर्णय घेण्यात आला आहे.


शाळांना सुट्टी - 


नवी मुंबईसह, पनवेलमधील सर्व शाळांना आज नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेनं सुट्टी जाहीर केली आहे. 


हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द


अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार असल्याने मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईला प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला.