मुंबई : Nitin Gadkari Corona positive : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले आहे. त्यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. याबाबत त्यांनी ट्विट करत माहिती दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

देशात आणि राज्यात कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. राजकीय नेते आणि मंत्री यांनाही कोरोनाची लागण होत आहे. महाराष्ट्रात 12 आणि 40 पेक्षाजास्त आमदार आणि राजकीय नेत्यांना कोरोना झाला आहे. काही दिवासांपासून राज्यात कोरोना (Corona) रुग्णांची संख्या वाढत आहे. पुन्हा एकादा कोरोना चाचण्या वाढवण्यात आल्या आहेत.  


आता कोरोनाचा संसर्ग केंद्रीय मंत्र्यांपर्यंत पोहोचला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाले आहे. त्यांनी याबाबत ट्विट केले आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना कोरोना चाचणी करुन घेण्याचे आवाहन केले आहे. सध्या गडकरी यांची प्रकृती उत्तम असून त्यांना सौम्य लक्षणे आहेत. तसेच सध्य ते गृहविलगीकरणात आहेत. त्याच्यावर उपचार सुरु आहे.



राजनाथ सिंह, जे.पी. नड्डा यांच्यानंतर आता गडकरी यांना कोरोनाची लागण झाली आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह तसेच भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना कोरोनाची लागण झाली होती. आता केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची दुसऱ्यांदा लागण झालेली आहे. कोरोनाची चाचणी केल्यानंतर चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


तसेच याआधी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना कोरोनाची लागण झाली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर त्यांनी ही माहिती दिली आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. कोरोनाची लागण होण्यापूर्वी त्यांनी महाराष्ट्र तसेच मुंबईतील कोरोना संसर्गाबाबत आढावा बैठक घेतली होती.