पुणे : अतिशिघ्र कवी म्हणून प्रसिद्ध असलेले आरपीआय नेते रामदास आठवलेंच्या मराठी किंवा हिंदी कविता आपण नेहमीच ऐकतो. पण त्यांची इंग्रजी कविता ऐकण्याची संधी मंगळवारी पुणेकरांना मिळाली. 


अभिनेत्री शर्मिला टागोर यांना फुटलं हसू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिम्बॉंयसिसमधील सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी त्यांनी ही उत्स्फुर्त अशी कविता ऐकवली. ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. आठवले यांची कविता आतून त्यादेखील खळखळून हसल्या. पाहुया आठवलेंची ही “यू आर फिल्म ॲक्टर, आय एम पॉलिटिकल ॲक्टर’ ही कविता त्यांच्याच शब्दांत. 


आठवलेंचं हिंग्राठी भाषण!


यावेळी आठवले यांचे भाषण देखील हिंग्राठी स्वरुपात होते. माझा पक्ष फक्त दलितांचा पक्ष नाही. त्यात सर्व समाजांना प्रवेश आहे. असं ते यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मताचा मी आहे. ब्राह्मणांसहीत सर्वच समाजांतील आर्थिक दुर्बल घटकांना आरक्षण मिळायला पाहिजे, असंही ते म्हणाले. दलित आणि ब्राह्मण एकत्र आले तर क्रांती घडते. सिम्बॉंयसिसच्या मुजुमदारांनी ते करून दाखवलय. असं सांगत त्यांनी उपस्थितांच्या टाळ्या मिळवल्या.