कोकणवासीयांसाठी आनंदाची बातमी, गर्दी टाळण्यासाठी रेल्वेने घेतला `हा` महत्त्वाचा निर्णय
Summer Special Trains : एकदा परिक्षेचा निकाल लागला की सर्व बालकांना ओढ लागते ती मामाच्या गावाला जाण्याची...मामाचे गाव म्हणजे भाचेमंडळीचा स्वर्ग...याचपार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या मंडळींसाठी रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Central Railway : प्रत्येत वर्षी वार्षिक परीक्षा संपल्या की मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीचे वेध लागते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर येते. "झुकू झुकू झुकू झुकू आगीन गाडी, धुरांच्या रेशा हवेत काढी, पलती झाडे पाहुया, मामाच्या गावाला जावुया." सुट्टी लागली रे लागरी की गावी कधी जाणारं असं व्हायचं. जर तुम्ही कुटूंबासह गावी जाण्याचा प्लॅन करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठया प्रमाणावर असत. सुट्ट्यांमध्ये कोकणवासीय गावी जात असतात. तर अनेक पर्यटक कोकणात पर्यटनासाठी जातात. याचपार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने कोकणात (Summer Special Trains) जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्या सुरू केल्या आहेत.
यामध्ये पुणे-रत्नागिरी आणि पनवेल-रत्नागिरी या साप्ताहिक गाड्या सोडण्यात येणार आहेत. सध्या कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या वाढली आहे. गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्यास सुरुवात केली आहे. पुणे आणि पनवेलहून रत्नागिरीसाठी या विशेष साप्ताहिक गाड्या सोडल्या जाणार आहेत. एकूण 16 गाड्या अनारक्षित पद्धतीने चालविण्यात येणार आहे. याआधी 942 उन्हाळी स्पेशल ट्रेनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा एकूण उन्हाळी विशेष गाड्यांची संख्या 958 वर पोहोचली आहे.
वाचा : जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर थोडे थांबा...
या उन्हाळी स्पेशल ट्रेन पनवेल-रत्नागिरी-पनवेल साप्ताहिक अनारक्षित विशेष (आठ फेऱ्या) 5 ते 26 मेपर्यंत धावतील. गाडी क्रमांक 01134 साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी दर शुक्रवारी रात्री 9.30 वाजता पनवेलहून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 4.30 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.
त्याचबरोबर गाडी क्रमांक 01133 साप्ताहिक अनारक्षित विशेष रत्नागिरी गाडी दर शुक्रवारी दुपारी 1 वाजता निघून त्याच दिवशी रात्री 8.30 वाजता पनवेलला पोहोचेल. या दोन्ही गाड्या रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड या स्थानकांवर थांबतील.
तर गाडी क्रमांक 01131 पुणे-रत्नागिरी-पुणे साप्ताहिक अनारक्षित विशेष गाडी दर गुरुवारी रात्री 8.50 वाजता पुण्याहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी 7.30 वाजता रत्नागिरीला पोहचणार आहे. गाडी क्रमांक 01132 साप्ताहिक अनारक्षित विशेष रत्नागिरी येथून दर शनिवारी दुपारी 1:00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 11:55 वाजता पुण्याला पोहोचेल. या दोन्ही गाड्या लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड येथे थांबणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी पाहता मध्य रेल्वेकडून हा निर्णय घेण्यात आला.