ठाणे : मध्य रेल्वेवर गोंधळ पाहायला मिळाला. ठाणे स्थानकात एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने लोकल सेवेवर परिणाम झाला. त्यामुळे ठाण्यातील दोन नंबर प्लयटफॉर्मवरील ठाणे - कल्याण लोकल गेली २० मिनिटे एकाच ठिकाणी उभी होती. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या धिम्या गाड्यांचे वेळापत्रक बिघडले. लोकल सेवेचा खोळंबा झाल्याने याचा त्रास घरी परतणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला.


ठाणे येथे एका महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, अशी चर्चा होती. दरम्यान, या महिलेला अपघात झाला का, याचीही चौकशी करण्यात येत होती. त्यामुळे लोकल थांबविण्यात आली. त्यामुळे त्याचा परिणाम हा मागून येणाऱ्या लोकलवर दिसून आला. २० मिनिटे गाडी एकाच ठिकाणी उभी असल्याचे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. दरम्यान, घटनस्थळी रेल्वे पोलीस पोहोचले आहेत.