special train for mumbai nagpue pune amravati : मध्य रेल्वेकडून अनेकदा महत्त्वाचे निर्णय घेण्यात येतात. याचदरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये गाड्यांचे 90 फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे प्रतीक्षा यादीचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. मुंबई, नागपूर आणि पुणे या मार्गावरुन धावणार असून  पश्चिम विदर्भातील प्रवाशांना याचा फायदा होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रवाशांची जादा गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते मुंबई ते नागपूर आणि कोल्हापूर विशेष 2 एकेरी स्पेशल ट्रेन चालवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-नागपूर जलद एकेरी विशेष गाडी सोमवार, 19 फेब्रुवारी रोजी मुंबईहून 00.20 वाजता सुटणार असून त्याच दिवशी 3.32 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाडीसाठी दादर, ठाणे, कल्याण, नाशिकरोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, मूर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, वर्धा स्थानकांवर थांबणार आहेत.


त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कोल्हापूर वन वे स्पेशल फास्ट 01099 ही एकरी स्पेशल ट्रेन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून मंगळवार, 20 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 0.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 11.30 वाजता श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनस, कोल्हापूर येथे पोहोचेल. दरम्यान, दादर, कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज, हातकणंगले आणि कोल्हापूर येथे ही गाडी थांबेल. ट्रेन क्रमांक 02103 आणि 01099 मध्ये 17 ICF कोच, एक AC II, चार AC III, 8 स्लीपर, 2 गार्ड ब्रेक्ससह 4 सामान्य द्वितीय श्रेणी कोच राहतील.