मुंबई : मंगळवारपासून मुंबईत परतीच्या पावसाने थैमान  घातले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाराष्ट्रभरात मुसळधार कोसळार्‍या पावसामुळे सार्‍यांचीच दैना केली आहे. शाळा - कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली. पावसाचा जोर पाहता मुंबईतील अनेक चाकरमान्यांनी ऑफिसला जाणं टाळलं. सलग दोन दिवस पडणार्‍या पावसामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली आहे. रस्ते वाहतुक, रेल्वे वाहतुक यासोबतच विमान वाहतुकही काही काळ बंद ठेवावी लागली होती. 


मध्य आणि पश्चिम रेल्वेने सुरक्षेच्या दृष्टीने बुधवारप्रमाणेच गुरूवार २१ सप्टेंबर रोजीही काही लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द केल्या आहेत. तर काही एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.



 


गुरूवार - २१ सप्टेंबर रोजी कोणत्या गाड्या झाल्या रद्द ? 


२२१०२ – मनमाड – सीएसएमटी राज्यराणी एक्स्प्रेस
११००७ – सीएसएमटी – पुणे डेक्कन एक्स्प्रेस
२२१०१- सीएसएमटी – मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस
११०१०- पुणे -सीएसएमटी सिंहगड एक्स्प्रेस
१२१२८- पुणे – सीएसएमटी इंटरसिटी एक्स्प्रेस
१२१२७- सीएसएमटी – पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस (२२ सप्टेंबररोजी धावणारी)


तर ११०२५ – भूसावळ – पुणे एक्स्प्रेस आणि  ११०२६ – पुणे – भूसावळ एक्स्प्रेस या गाड्यांच्या मार्गांमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.