मुंबई : सीएसटीएम पूल दुर्घटनेत ६ जणांना जीव गमवावा लागला होता. यानंतर पालिकेने ही जबाबदारी रेल्वेवर ढकलण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर हा पूल पालिकेच्याच अख्त्यारित असल्याची उपरती पालिकेला आली होती. एलफिन्स्टन आणि अंधेरी पूल दुर्घटनेवेळीही जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न झाला. एलफिन्स्टन येथे लष्कराने पूल बांधला. सीएसटीएम पूलाच्या स्ट्रक्चरल ऑडिटर नीरज देसाईवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने त्यांच्या अख्त्यारीतील पूल पाडण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भांडुप, कुर्ला, विक्रोळी, दिवा आणि कल्याण या ठिकाणचे पूल मध्य रेल्वेतर्फे पाडण्यात येणार आहेत. पूल दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच या कार्यवाहीस सुरुवात होणार आहे. 



सीएसएमटी येथील पूल दुर्घटनेप्रकरणी मुंबई पोलिसांनी नीरज देसाईवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. निरज देसाईची चौकशी सुरू झाली आहे. त्याच्याविरुद्ध ३०४ अ ( निष्काळजीपणा...२ वर्षे शिक्षा) हे कलम काढून ३०४ भाग २ हे कलम लावण्यात आले आहे. ( ज्यामध्ये १० वर्षे शिक्षा होवू शकते.) निरज देसाई हे डी डी देसाई स्ट्रक्चरल असो.चा मालक आहेत.