नागपूर : पूर्व विदर्भात २९ ते ३१ ऑगस्ट दरम्यान आलेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानाची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय पथकाने आजपासून सुरु केली. केंद्रीय पथकाने आज नागपुर जिल्ह्यात पाहणी केली. कामठी, पारशिवनी, मौदा या तालुक्यातील गावांमध्ये केंद्रीय पथकाने भेट दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेती, गुरेढोरे, राहते घर व अन्य मालमत्तेचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं यावेळी पुरग्रस्तांनी नागरिकांनी पथकाला सांगितले. विभागात ३४ तालुक्यातील ८८ हजार ८६४ हेक्टर शेतीचे नुकसान झाले असून भात कापूस, सोयाबीन या प्रमुख पिकांची मोठया प्रमाणात हानी झाली आहे.  विभागात २३ हजार घरांची पडझड झाली आहे.


 नागपूर दाखल झाल्यानंतर केंद्रीय पथक विभागीय कार्यालयांमध्ये अगोदर आकडेवारीची माहिती घेतली.  त्यानंतर एक पथक चंद्रपूर, गडचिरोलीकडे तर एक पथक नागपूर जिल्ह्यात पाहणी करता रवाना रवान झाले. नागपूर जिल्ह्यात या  केंद्रीय पथकानं कामठी तालुक्याला पुरग्रस्त सोनेगावाला भेट दिली. या पथकामध्ये केंद्रीय पथकातील  महेंद्र सहारे, एस.एस.मोदी आणि आर. पी. सिंग  यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर  व अधिनस्थ अधिकारी तसेच महसूल विभागाचे या भागातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 


पुरामुळे मौजे सोनेगाव राजा येथील १५५  हेक्टरवरील पिके बाधित झाली असून,  ३५४ घरांपैकी तब्बल ११४ घरांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे सर्व पायाभूत सुविधायुक्त  ठिकाणी सोनेगावचे पुनर्वसन करण्याची मागणी  केंद्रीय पथकाकडे केली आहे.  २९ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून नदीचे पाणी गावात आणि शेतीत शिरले होते.  कन्हान नदीच्या पुराचे पाणी  पात्र सोडून दोन्ही बाजूंनी पाच किलोमीटरपर्यंत पाणी पसरले होते. त्यामुळे नदीकाठावरील घरे, शेती पिके, सोयाबीन, कापसाचे प्रचंड नुकसान झाले. पारशिवनी तालुक्यातील सिंगार दीपच्या गावकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या.