COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुणे : जेलमधून जामीनावर बाहेर आल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर दिसले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पश्चिम महाराष्ट्र हल्लाबोल आंदोलनाचा समारोप पुण्यात झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचा स्थापना दिवसही आजच आहे. त्यामुळे २० वा स्थापना दिवस तसेच हल्लाबोल आंदोलनाचा समारोप अशा दुहेरी औचित्यावर पक्षाचं शक्तीप्रदर्शन पार पडलं. या कार्यक्रमामध्ये छगन भुजबळ यांनी भाजपवर अक्षरश: शाब्दिक वार केले. सर्व प्रॉपर्टी अॅटच केल्या, त्यामुळे बाहेर आल्यावर खायचे काय याची भ्रांत होती. पण बाहेर आल्यावर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या खात्यात पंधरा लाख जमा झाले होते. नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला. सर्वांना नोकऱ्या लागल्यामुळे सभेला यायला माणसं भेटत नव्हती, अशा शब्दांमध्ये भुजबळांनी भाजपला चिमटे काढले.


'मराठा आरक्षणाला पाठिंबा'


माझा मराठा समाज आरक्षाणाला पाठिंबा आहे. मराठा समाज हा मोठा भाऊ, ओबीसी आणि इतर धाकटे भाऊ आहेत. माझा मराठा समाज आरक्षणाला विरोध नाही. त्यांना आरक्षण मिळावं यासाठी ओबीसींना सोबत घेऊन मी रस्त्यावर यायला तयार आहे, असं भुजबळ म्हणाले.


भुजबळांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे


- अडीच तीन वर्षानंतर बोलायला उभा राहिलो आहे


- तुमच्यासमोर बोलण्याची संधी न्याय देवतेमुळे मिळाली


- न्यायदेवतेवर विश्वास आहे. न्याय देवतेसमोर बाजू मांडून निर्दोषत्व सिद्ध करणार


- माझ्या सुटकेसाठी अनेकांनी प्रयत्न केले. भाजपचे मंत्री दिलीप कांबळेही माझी सुटका व्हावी, असं जाहीर पणे बोलले होते. त्या सर्वांचे आभार. उद्धव ठाकरे, राज ठाकरे, रामदास आठवले यांचे आभार.


- आभार मानण्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. राहणार की जाणार चर्चा सुरु झाली.


- माझ्यावरच अडीच वर्षापुर्वीच हल्ला बोल झाला. धाडीच धाडी घालण्यात आल्या.


- सुना-मुली धाडींमुळे दुसऱ्याच्या घरी जाऊन राहयच्या. मॉलमध्ये दिवस काढले.


- धाडीत काही सापडले नाही. अटक केली ती महाराष्ट्र सदनातील कथित भ्रष्टाचारामुळे.


- शंभर कोटींच्या टेंडरमध्ये ८५० कोटीचा भ्रष्टाचार कसा? हे कसं शक्य आहे.


- महाराष्ट्र सदनात पंतप्रधान मोदी जातात. भाजप अध्यक्ष अमित शहा तीन तीन दिवस बैठका घेतात. आनंद आहे.


- शहा म्हणतात महाराष्ट्र सदन सुंदर, और छगन भुजबळ अंदर...


- माजी पोलीस महासंचालक प्रविण दीक्षित यांच्यावर भुजबळ यांचा आरोप. दीक्षित यांना डीजी व्हायचे होते म्हणून एका वर्षात त्यांनीच आपला अहवाल बदलून मला दोषी ठरवले.


- माझ्या सगळ्या प्रॉपर्टी जप्त केल्या, मात्र या जनतेचं प्रेम जप्त करू शकत नाही


- सर्व प्रॉपर्टी अॅटच केल्या, पण जनतेचे प्रेम अटॅच करु शकत नाही.


- सर्व प्रॉपर्टी अॅटच केल्या, त्यामुळे बाहेर आल्यावर खायचे काय याची भ्रांत होती. पण बाहेर आल्यावर कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या खात्यात पंधरा लाख जमा झाले होते.


- नोटाबंदीमुळे दहशतवाद संपला


- सर्वांना नोकऱ्या लागल्यामुळे सभेला यायला माणसं भेटत नव्हती


- सत्तेत येऊन ४ वर्षे झाली, ४ शहरं सांगा जी आधीपेक्षा स्मार्ट बनली


- भ्रष्टाचार संपल्याचे चार जिल्हे दाखवा. नवीन हॉस्पिटल उभारलेले चार जिल्हे सांगा.


- महाराष्ट्र सदनबाबतचे निर्णय तत्कालिन मंत्रीमंडळ तसेच संबंधित समितीच्या मंजूरीनेच झालेत


- दीडपट हमी भाव मिळायला लागला. त्यामुळे शेतकरी आत्महत्या करत नाहीत. आता व्यापारी आत्महत्या करतात.


- शेतकरी आता त्याच्या गावाऐवजी मंत्रालयात येऊन आत्महत्या करतात.


- शेतकरी कांदा फेकतोय, टोमॅटो फेकतोय, दुध फेकतोय. कोणती शेतकरी खूष आहे


- पवार कृषिमंत्री होते तेव्हा शेतमाल उत्पन्न वाढून २५ देशात निर्यात व्हायची


- माझा मराठा समाज आरक्षाणाला पाठिंबा आहे


- मराठा समाज हा मोठा भाऊ, ओबीसी आणि इतर धाकटे भाऊ आहेत


- माझा मराठा समाज आरक्षणाला विरोध नाही. त्यांना आरक्षण मिळावं यासाठी ओबीसींना सोबत घेऊन मी रस्त्यावर यायला तयार आहे.


- आज जे चाललंय ते समाजा- समाजात भांडण लावण्याचं चाललंय


- मंडल कमिशनमुळे शिवसेना सोडली.


- पवारांमुळे ओबीसींना आरक्षण मिळालं


- आरक्षणाला विरोध असणाऱ्या पक्षात परत कसा जाऊ?


- शिवसेनेनं मंडलला विरोध केला म्हणून मी राष्ट्रवादीत प्रवेश केला


- शरद पवारांमुळे ओबीसींना आरक्षण मिळाले. राज्यात मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली. महिलांना आरक्षण मिळाले. मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर झाले. हे कसे विसरणार?


- दोन-अडीच वर्षात माझ्या घरचे लोक आठवड्यातून तीन दिवस शरद पवारांच्या घरी जायचे


- सर्व जाती, सर्व धर्म , सर्व पक्षांना सोबत घेऊन चालणं गरजेचं आहे


- बचेंगे तो और भी लंडेगे!, रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार