COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक : तुरुंगातून जामिनावर सुटल्यावर पहिल्यांदाच छगन भुजबळ आज  नाशिकमध्ये येतायत....भुजबळांचा हा पाच दिवासांचा झंझावाती दौरा असणार आहे.... त्यामध्ये शिर्डी, सप्तशृंगी गड, त्र्यंबकेश्वरसह  विविध धार्मिक संस्थांनांना भुजबळ भेट देणार आहेत.  शुक्रवारी भुजबळ येवला मतदारसंघात एक दिवस घालवणार आहेत... छगन भुजबळ 19 जूनला नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांच्या राजकीय गाठीभेटी घेणार आहेत.


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे नाशिकमध्ये आगमन झाले आहे.  छगन भुजबळ तब्बल अडीच वर्षानंतर होंमग्राऊंड येणार असंल्यामुळे भुजबळ समर्थक राष्ट्रवादी पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी यांच्यात चांगलाच उत्साह बघायला मिळतो अडीच वर्षानंतर येणाऱ्या भुजबळांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. 


राष्ट्रवादी भवन येथे मोठी गुढी उभारण्यात आली आहे तर नाशिकच्या विविध भागात स्वागत फलक लावण्यात आले आहे. ढोल ताश्यांच्या गजरात स्वागत केलं जाणार आहे. पाथर्डी फाटा परिसरात असलेल्या शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शहरात ठिकठिकाणी रॅली काढली जाणार आहे. त्यामुळे मोठ्या जल्लोषमध्ये भुजबळांचे स्वागत केले जाणार आहे


नाशिक  जिल्ह्यात येत्या गुरुवारी छगन भुजबळ नावाचं वादळ पुन्हा एकदा सक्रिय होणार आहे. पाच दिवासाच्या झंझावाती कार्यक्रमात शिरडी  सप्तशृंगी गड त्र्यंबकेश्वरसह  विविध धार्मिक संस्थांनाना भेटी देणार आहेत या दरम्यान शुक्रवारी येवला मतदारसंघात आपला एक दिवस ते व्यतीत करणार असून 19 तारखेला नाशिकमध्ये भुजबळ फार्मवर कार्यकर्त्यांच्या राजकीय गाठीभेटी घेणार आहेत.