Kalyan Crime News :   कल्याण कोळशेवाडी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. ज्यामुळे हे दोघे जेल मध्ये गेले होते बाहेर आल्यावर त्यांनी परत तेच कृत्य केले आहे. चोरांचा हा कारनामा पाहून पोलिसांनी डोक्याला हात लावला. अवघ्या 20 मिनीटांत या चोरट्यांनी हात सफाई केली. पोलिसांनी देखील अवघ्या काही तासांतच यांना पुन्हा गजाआड केले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आकाश पारचे आणि कुणाल देहडे अशी या दोन्ही चोरट्यांची नावे आहेत. या दोघांनी अवघ्या वीस मिनिटात दोन महिलांची चैन स्नेचिंग करत धूम ठोकली होती. कोलशेवाडी पोलिसांनी बारा तासाच्या आत दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.  आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात 25 गुन्हे दाखल आहेत. महिनाभर पूर्वी तो जेलमधून सुटला होता.जेलमधून सुटल्यावर त्याने आधी बाईक चोरी केली नंतर आपल्या साथीदाराच्या मदतीने चैन स्नेचींग सुरू केली आणी पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात अडकला .या दोघांकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


20 मिनीटांत दोन सोनसाखळ्या चोरल्या


काही दिवसांपूर्वी कल्याण पूर्व 60 फुटी रोडवर चालणाऱ्या एका महिलेची चैन हीसकावून दोन चोर दुचाकी वर पळून गेले होते. 
याच दोन चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटात कल्याण पश्चिम येथे रस्त्याने पायी चालणाऱ्या एका शिक्षिकेची देखील चॅन लंपास करत धूम ठोकली होती. अवघ्या वीस मिनिटात या दोन चोरट्यांनी या दोन चैन स्नॅचिंग केल्या. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. एसीपी कल्याणजी घेटे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कोळशेवाडी पोलिसांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला.. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी अवघ्या 12 तासात आकाश उर्फ बाबू पारचे, कुणाल देहडे या दोन चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. 


तपासादरम्यान आकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात या आधी देखील विविध पोलीस ठाण्यामध्ये चैन स्नॅचिंग आणि मोटरसायकल चोरीचे तब्बल 25 गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली. महिनाभरा पूर्वीच आकाश जेलमधून सुटला होता. जेलमधून सुटल्यानंतर पुन्हा त्याने काही दिवसातच उल्हासनगर येथून एक बाईक चोरली. आपल्या साथीदाराच्या मदतीने त्याने कल्याण मध्ये अवघ्या वीस मिनिटात दोन महिलांना लुबाडलं कोलशेवाडी पोलिसांनी अवघ्या बारा तासात या दोन्ही सराईत आरोपींना बेड्या ठोकल्यात त्यांनी आणखी काही गुन्हे केल्याचा संशय असून पोलीस पुढील तपास करत आहेत.