चंद्रपूर : एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे. चंद्रपुरात (Chandrapur) एक लग्न पार पडले. मात्र, एक व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दारुबंदीला आव्हान  (Challenge of liquor ban) देणारा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. लग्नपत्रिकेत (wedding card) दारुची बाटली (liquor  bottle) आणि चखणा या व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओची सत्यता पडताळून कारवाईचे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१५ डिसेंबरला हा लग्नसोहळा झाला. चौकशीबाबत पोलिसांपुढे एक आव्हान असणार आहे. या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेसह दारू - चखणा दिला गेल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. चंद्रपूर जिल्ह्यात सहा वर्षांपासून दारूबंदी (liquor ban) आहे, अशा पद्धतीने खुलेआम निमंत्रण पत्रिकेसह दारू वितरणाचा प्रयत्न झाल्याने खळबळ उढाली आहे. पोलिसांपुढे या वायरल व्हिडिओची सत्यता पडताळून पाहून कारवाईचे आव्हान असणार आहे.


औद्योगिक शहर असलेल्या बल्लारपूर येथील व्यापाऱ्याच्या घरची ही पत्रिका आहे. त्यांना या वायरल व्हिडिओ विषयी विचारले असता काही निवडक पत्रिका आपण छापल्या होत्या, हे त्यांनी कबुल केले. मात्र नागपुरात पत्रिका वाटताना त्यात दारू होती. मात्र चंद्रपुरात ड्राय फ्रुट होते अशी माहिती दिली.


चंद्रपूर जिल्ह्यात एकीकडे दारूबंदीच्या निमित्ताने पोलिसांवर हल्ले होत आहेत. कोट्यवधी रुपयांची दारू पोलीस जप्त करत आहेत. हजारो आरोपी तयार होत आहेत. तर दुसरीकडे ही पत्रिका चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीची वास्तविकता सर्वांसमोर मांडत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील फसलेल्या दारूबंदीच्या चौकशीची मागणी दारूबंदी कार्यकर्त्यांनी केली आहे.


मंगाणी यांचा अनोख्या पत्रिकेचा व्हिडिओ कोणीतरी परिचितानेच काढला असावा आणि तो व्हायरल केला असावा, अशी शक्यता आहे त्यामुळे चंद्रपूर पोलिसांपुढे आता यातील सत्यता पडताळून पाहून कारवाई करण्याचे एक आव्हान असणार आहे.