मुंबई : इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी -२० मालिकेत भारतीय संघाने पहिल्या सामन्यात सलामीवीर शिखर धवन आणि केएल राहुलला संधी दिली, पण पुढच्या सामन्यात सलामीची जोडी बदलली. दुसर्‍या टी -20 सामन्यात केएल राहुलसह सलामीसाठी इशान किशनची निवड झाली. त्याचबरोबर नियमित सलामीवीर रोहित शर्मा याला विश्रांती दिल्याचा हवाला देत प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवण्यात आलं. पण आता पुढच्या सामन्यातही रोहित शर्माच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खराब फॉर्ममुळे पहिल्या सामन्यानंतर शिखर धवनला बाहेर बसावे लागले, तर के.एल. राहुल याला सलग दोन सामन्यात काही खास कामगिरी करता आली नाही. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली त्याला फॉर्मात परतण्यासाठी आणखी एक संधी द्यायला देऊ शकतो. दुसर्‍या टी -२० सामन्यात शानदार प्रदर्शन करणारा ईशान किशन सलामीवीर म्हणून कायम राहील. हेच कारण आहे की तिसर्‍या टी -20 सामन्यातही रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हनचा भाग होणार नाही.


चौथ्या सामन्यात मात्र रोहित शर्माला कर्णधार म्हणून पाहिले जाऊ शकते, तर विराट कोहलीला विश्रांती दिली तर असं होऊ शकतं. चौथ्या सामन्यात रोहित शर्मा ओपनिंग करेल. तर केएल राहुलला प्लेइंग इलेव्हनमधून वगळलं जावू शकतं. ईशान किशन मुंबई इंडियन्स संघाचा देखील कर्णधार असलेल्या रोहित शर्मासोबत सलामी करताना दिसेल. सूर्यकुमार यादवला तिसर्‍या क्रमांकावर संधी मिळू शकेल, तर ऋषभ पंत चौथ्या क्रमांकावर खेळेल. त्याचबरोबर श्रेयस अय्यर पाचव्या क्रमांकावर खेळू शकतो.


पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने पुष्टी केली होती की, रोहित शर्माला काही सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली आहे. पुढच्या सामन्यात हिट मॅन रोहित शर्माच्या पुनरागमन होईल असं वाटत होतं. पण झालं नाही. पण वनडे मालिकेपूर्वी विराट कोहली हा केएल राहुलला फॉर्म मिळावा यासाठी प्रयत्न करेल. यामुळे रोहित शर्मा आणखी एक टी -20 सामना गमावू शकतो. सध्या भारताकडे चार खेळाडू सलामीचे दावेदार आहेत. अशा परिस्थितीत भारतीय व्यवस्थापनही गोंधळलेले आहे.