COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

औरंगाबाद : औरंगाबादमधील दंगल ही शिवसेनेनं नियोजित केल्याचा आरोप एमआयएम पक्षाचे आमदार इम्तियाज जलील यांनी केलाय. तर औरंगाबादेत झालेली दंगल ही एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांनी केलाय.


दंगलीचे अनेक व्हिडिओ समोर


दरम्यान औरंगाबादमध्ये शुक्रवारी रात्री झालेल्या दंगलीचे अनेक व्हिडिओ सध्या समोर येतायत. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली.


पोलिसांची बघ्याची भूमिका?


बहुतांश ठिकाणी पोलीस उपस्थित होते. पण त्यांचा दंगलखोरांवर कुठलाही अंकूश नव्हता. डोळ्यासमोर जाळपोळ सुरू असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. 


राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आज औरंगाबादच्या दंगलीवरून सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं. औरंगाबादची दंगल पुर्वनियोजित होती. राज्याचा जातीय सलोखा सरकारच बिघडवत असल्याचा आरोप अजित पवारांनी केलाय.



औरंगाबाद दंगल हे पोलिसांचं अपयश आहे, असं सांगतानाच गृहमंत्री पद स्वतंत्र असणं गरजेचं आहे, असंही अजित पवारांनी म्हटलं.