Ambadas danve vs Sandipan bhumre : संभाजीनगर ( Aurangabad News ) येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जोरदार राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं. ठाकरे गटाचे आमदार आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ( Ambadas danve ) आणि फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे ( Sandipan bhumre ) यांच्यात जोरदार राडा झाला होता. यावेळी वाद एवढा पेटला की, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेल्याचं पहायला मिळालं. त्यानंतर संभाजीनगरमध्ये वातावरण चांगलंच तापल्याचं दिसून आलं होतं. अशातच यावर प्रतिक्रिया देताना चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire ) यांनी अंबादास दानवे यांनी जे केलं ते योग्यच होतं. मी असतो तर मारलं असतं, असं मत व्यक्त केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपाच्या राज्यात सर्वत्र सावळा गोंधळ सुरू आहे. आज ते लोकसभेची तयारी करत आहोत असा भास निर्माण करत आहे. मात्र ते स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूक ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये आपल्याला अंधारात ठेवून घेतील त्यामुळे आमची तयारी सुरू आहे, असं ही चंद्रकांत खैरे ( Chandrakant Khaire On Sandipan bhumre) यांनी सांगितलं आहे.


आणखी वाचा - पुन्हा राजकीय भूकंप! शिवसेना राष्ट्रवादी पाठोपाठ महाराष्ट्रात आणखी एक पक्ष फुटला?



नेमकं प्रकरण काय?


पालकमंत्री संदीपान भुमरे निधी देत नाहीत, असा आरोप कन्नड मतदारसंघाचे आणि ठाकरे गटाचे आमदार उदयसिंह राजपूत केला होता. याच मुद्द्यावरून अंबादास दानवे आक्रमक झाले. त्यामुळे भुमरे आणि दानवे यांच्यात वाद पेटला. निधीवाटपाचा मुद्दा दानवे यांनी आक्रमकपणे मांडला. त्यामुळे वातावरण चांगलंच पेटलं. त्यावर औरंगाबादचे पालकमंत्री आणि शिंदे गटाचे आमदार संदीपान भुमरे यांनीही प्रत्युत्तर दिलं. यावेळी अंबादास दानवे हे संदीपान भुमरे यांच्या अंगावर धावून गेले. त्यानंतर भुमरेही मोठ्या आवाजात दानवेंना प्रत्युत्तर देत होते. त्याचा व्हि़डीओ देखील व्हायरल होत आहे.