कोल्हापूर : राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील पुन्हा एकदा आक्रमक आणि संतापलेले पाहायला मिळाले. माझ्यावर केलेले आरोप खपवून घेणार नाही, इतकंच नाही तर कोर्टात खेचेन असा सज्जड दमच त्यांनी विरोधकांना भरला. आरोप केल्याने प्रसिद्धी मिळते अशी टीकाही त्यांनी केली. गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरातील तावडे हॉटेल परिसरातील अतिक्रमण काढण्याला चंद्रकांत पाटील आडकाठी करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या २० वर्षात ज्यांनी शासकीय जमिनीवर आरक्षणे हटली आणि हॉटेल्स, शिक्षणसंस्था आणि मंगलकार्यालये थाटली आहेत. त्या सर्व प्रकरणाची यादी मी मागवली आहेच. या सर्व प्रकरणांच्मुया ळापर्यंत जाऊन चौकशी करणार आहे. चौकशी जे कोणी दोषी सापडतील त्यांच्यावर कारवाई करणार आहे. आणप आरोप करण्याआधी मी राज्याचा नंबर दोनचा मंत्री आणि पक्षाचा बलाढ्य नेता आहे, हे विरोधकांनी लक्षात ठेवावे, असा इशाराही  चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला.


शहरात हॉटेल परिसरातील अतिक्रमणे हटविण्यासाठी प्रयत्न आहेत. मात्र कारवाई रोकण्याचा निर्णय राज्याच्या नगरविकास खात्याच्या आदेशानुसार आणि अतिक्रमणे नियमित करण्याच्या कायद्यात बसवण्यासाठी मुंबईतील बैठकीत झालेला निर्णय आहे. त्याता माझा वैयक्तिक काही हस्तक्षेप नाही. तरी देखील विरोधक माझ्यावर आरोप करीत आहेत. ते चुकीचे असून मला जास्त बोलायला लावू नका. विरोधकांच्या आरोपामुळे पाटील खूपच संतापलेले पाहायला मिळालेत. त्यांनी विरोधकांना दमच भरलाय.