जळगाव : सरकार असंच सगळं माफ करत गेलं तर एके दिवशी सरकारची परिस्थिती कर्जबाजारी शेतकऱ्यांप्रमाणे होईल असं विधान महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलयं.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेतकरी किती वर्षे कर्ज काढणार आणि सरकार फेडणार, घेतलेलं कर्ज त्याच वर्षी भरायला हवं असाही सल्ला यावेळी चंद्रकांत पाटील यांनी शेतकऱ्यांना दिलाय.


जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर इथल्या संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम शुभारंभप्रसंगी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केलं.



कर्जमाफीनंतर सरकारवर कर्जबाजारी होण्याची वेळ येण्याबाबत चंद्रकांत पाटील यांनी जाहीर वक्तव्य केल्यानं याबाबत नाराजी व्यक्त होतेय.