चंद्रकांतदादांना आता वाट फक्त पक्षाच्या आदेशाची
कोल्हापूर जिल्ह्यात आतापासूनच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय
कोल्हापूर : पक्षानं आदेश दिले तर कोल्हापूर उत्तरमधून मला विधानसभा निवडणूक लढवावी लागेल असं वक्तव्य राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय. कोल्हापुरात पक्षानं आयोजित केलेल्या कार्यकारणीच्या मेळाव्यात ते बोलत होते. कोल्हापूर जिल्ह्यात आतापासूनच विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालीय... त्यामुळं कोल्हापूर उत्तरमधून भाजपकडून कोण निवडणूक लढवणार? याची जोरदार चर्चा सुरु आहे.