कोल्हापूर : राज्यभरातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकराने अनोखी शक्कल लढवली आहे. कर्जमाफीसाठी सरकार मुंबईतील बहुचर्चीत शक्ती मिलची जागा विकण्याचा विचार करत आहे. त्याबाबतचे स्पष्ट संकेत राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठी निधी उभारण्यासाठी मुंबईतील शक्ती मिलच्या जागेची विक्री केली जाईल, असे चंद्रकांत पाटील म्हणाले. ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरकार लवकरच शक्ती मिलची मालमत्ता ताब्यात घेणार असल्याचेही पाटील यांनी स्पष्ट केले.


शक्ती मील ही मुंबईतील बहुचर्चीत मिल आहे. काही वर्षांपूर्वी एका महिला पत्रकारावर याच मिलच्या परिसरात बलात्कार झाला होता. या प्रकरणानंतर राज्यभरत एकच खळबळ उडाली होती. तेव्हापासून ही मिल अधिक चर्चेत आली आहे. प्राप्त  माहितीनुसार शक्ती मिलच्या जागेची आजच्या बाजारभावाने होत असलेली किंमत ३८ हजार कोटींच्या घरात जात आहे. त्यामुळे शोतकरी कर्जमाफीसाठी मोठी रक्कम उभा करता येऊ शकते, असा सरकारचा विचार आहे. मात्र, सरकार असा विचार करत असले तरी, ही जमीन मिळणे हे वाटते तितके सोपे नाही. कारण शक्ती मिलच्या जागेबाबतचे प्रकरण न्यायालयात प्रविष्ट आहे. त्यामुळे ही जागा व्रिकी करायची तर आगोदर न्यायायलयाकडून ही जमीन सरकारला मिळवावी लागेल. मगच त्याबाबत निर्णय होऊ शकतो.


दरम्यान, सरकारने कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला आहे. निर्णय जाहीर केल्यावर सरकारने कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजानी करण्यासाठी कोणत्या मार्गाने निधी उभा करता येईल, याबाब चाचपणी सुरू केली आहे.