आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर:  चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरात चालकाला मिरगीचा झटका आल्याने मोठा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. यामुळे बस थेट एका गॅरेजमध्ये शिरली. यामुळे गॅरेजचे मोठे नुकसान झाले. कशी झाली ही घटना? सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या घटनेत एक बस ब्रम्हपुरीहुन चंद्रपूरला निघाली होती. त्या दिवसातील ही शेवटची एसटी बस  होती. अपघातग्रस्त बसमधून साधारण 35 प्रवाशांनी कशीबशी स्वत:ची सुटका करुन घेतली. यात 8 प्रवासी जखमी झाले असून जखमींना रूग्णालयात करण्यात आले आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करत आहेत. याप्रकरणी पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे. 


चंद्रपूर शहरातील सिंदेवाही शहरात नागपूर महामार्गावरील पेट्रोल पंप जवळ शंकर मिस्त्री यांच्या गॅरेजमध्ये एसटी महामंडळाची बस शिरली. ब्रम्हपुरीहुन चंद्रपूरला जाणारी ही शेवटची बस होती. बस  चालकाला मिरगीचा झटका आल्याने त्याचे बसवरील नियंत्रण सुटले. यात 8 प्रवासी जखमी झाले आहेत. 


उल्हासनगरात घरात घुसून डॉक्टर आणि त्याच्या परिवारावर जीवघेणा हल्ला; कारण धक्कादायक!


चालक सचिन कुळमेथे असे बस चालकाचे नाव होते. अपघातातील एसटी बसची धडक इतकी जोरदार होती की यात दोन दुचाकी वाहन, एक ट्रॅक्टर आणि दोन ते तीन चार चाकी वाहनांची मोडतोड झाली. बसमधील प्रवाशांनी स्वतःची कशीबशी सुटका करून घेतली. तर जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.


शहापुरात 'पूर', मध्य रेल्वे विस्कळीत, कल्याण- कसारावरील वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद