चंद्रपूर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील सेलिब्रिटी वाघीण असलेल्या माया या वाघिणीने पुन्हा एकदा पिल्लांना जन्म दिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वाघिणीने पिल्लांना जन्म दिल्याची ही गोड बातमी कालच समोर आली. शुक्रवारी दुपारी काही पर्यटक ताडोबा तलाव आणि पांढरपौनी भागात फिरत असतांना त्यांना माया वाघीण आपल्या तोंडात एका बछड्याला घेऊन जातांना दिसली. 


या वाघिणीमागे एक पिल्लू जातांना पण दिसून आले आहे. विशेष म्हणजे माया वाघिणीने पिल्लांना जन्म देण्याची ही तिसरी वेळ आहे. 


यापूर्वी सुद्धा माया आणि तिच्या पिल्लांची चित्र मोठ्या प्रमाणात सोशल साईट्स वर वायरल झाले आहेत आणि यावर आधारित एक टपाल तिकीट डाक विभागाने प्रकाशित देखील केले आहे.



माया वाघिणीसोबत सध्या २ पिल्लं दिसत असली तरी तिने नक्की किती पिल्लांना जन्म दिलाय या बाबत अजून कुठलाच अंदाज लावण्यात आलेला नाहीये.