चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात सलग तिस-या वर्षी अस्वलीने पिलांना जन्म दिल्याची घटना समोर आली आहे. एखाद्या जंगलात नाही तर गर्दीच्या ठिकाणी असलेल्या परिसरात अस्वलीने पिलांना जन्म दिलाय. 


मूल शहरातील नागविदर्भ चरखा संघ कार्यालयाजवळ असलेल्या पडक्या घरात पिलांसह अस्वलीने ठाण मांडले होते. वनविभागाने या भागातील नागरिकांना सावधगिरीचा सूचना दिल्या आहेत. त्यांना वहिवाटीचा मार्ग सध्या टाळण्याची सूचना करण्यात आली आहे. नागरिकांनीही वनविभागाला सहकार्य केले असून यामुळे अस्वल आणि पिलांच्या रक्षणासाठी स्थानिक देखील सरसावल्याचे चित्र आहे.