चंद्रपूर: शहरालगत वाघांचा मुक्तसंचार बघायला मिळतो आहे. आशियातील सर्वात मोठे वीज निर्मिती केंद्र शहराच्या शेजारी आहे. इरई धरण आणि ताडोबा जंगल यांना जोडून असलेल्या या वीज केंद्राच्या परिसरात वाघांचा नेहमी वावर असतो. मात्र वीज केंद्र कर्मचारी वसाहत असलेल्या भागात वाघांचे असे दर्शन अडचणीचे ठरत आहे.


स्थानिकांच्या पोटात भीतीचा गोळा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अगदी वर्दळीच्या मार्गावर रात्री साडेनऊच्या सुमारास वाघीण आणि तिच्या ३ बछड्यांचे हे बागडणे स्थानिकांच्या पोटात गोळा उठवून गेले आहे. या रस्त्यावरूनच हजारो कर्मचाऱ्यांना रोज ये-जा करावी लागते. महाऔष्णिक वीज केंद्र वसाहत मार्गावर वाघीण आणि बछड्यांचे दर्शन झाल्याने चिंता वाढली आहे. सध्या वायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपल्या बछड्यांना वाचविण्यासाठी वाघीण बाईकस्वारावर बळेबळे चाल करून गेल्याचा व्हिडिओ वायरल झाला आहे.


वाघीणीलाही आवडले इथरे वातावरण


पाण्याचे मुबलक स्रोत आणि घनदाट झाडी यामुळे वीज केंद्र आणि वसाहत परिसरात वाघाचे बस्तान वाढले आहे. वीज केंद्र प्रशासन आणि वनविभाग परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मोठे नाले, बाभळीचे बन आणि इतर झाडांचे आच्छादन या भागात वाघ-बिबटे-अस्वल यांच्यासाठी आश्रयस्थान बनले असून पिलं वाढविण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित जागा हवी असताना वाघीण ही जागा निवडते यावरून या भागाचे महत्व लक्षात येते.