आशिष आंबाडे, झी मीडिया, चंद्रपूर : मुलगा आमदार असून आई महाकाली देवीच्या यात्रेत बांबूच्या टोपल्या विकतेय (MLA Mother Sells Bamboo baskets). यांच्या या साधेपणाने सगळ्यांची मन जिंकली आहेत. गंगुबाई अर्थात अम्मा जोरगेवार मागील पन्नास वर्षे चंद्रपुरात बांबूपासून बनवलेल्या ताटवे टोपल्या विकत आहेत.  गंगुबाई जोरगेवार (Gangubai Jorgewar) आहेत चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार (Chandrapur Independent MLA Kishore Jorgewar ) यांच्या मातोश्री आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रपूरच्या घनदाट वस्तीत गेली पन्नास वर्षे नेटाने हाच व्यवसाय करणाऱ्या अम्मा जोरगेवार यांनी यंदा देखील देवी महाकाली यात्रेत आपला व्यवसाय थाटला आहे. तीच घासाघीस, तेच सौदे आणि त्यानंतर श्रद्धेने देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्याचा प्रयत्न.  वार्धक्य आले तरी आणि मुलगा लोकप्रतिनिधी झाला तरी गंगूबाईंची व्यावसायिक धडपड  जारी आहे. 


गंगुबाई यांचा मुलगा चंद्रपूरचा आमदार आहे. 80 वर्षांच्या गंगुबाई चंद्रपूरच्या देवी महाकाली यात्रेत विकतात बांबूपासून बनवलेल्या टोपल्या आणि इतर वस्तू. गंगुबाई जोरगेवार वयाच्या 80 व्या वर्षी आपल्या व्यवसायाशी एकनिष्ठ आहेत. वार्धक्य आले असले तरी बुरुड कारागिरांशी थेट संपर्क असलेल्या आणि आपला व्यवसाय नेटाने चालविणाऱ्या गंगुबाई यंदाही देवी महाकाली यात्रेत आपला व्यवसाय समर्थपणे करत आहेत. 


अम्मा जोरगेवार यांनी यंदा देखील देवी महाकाली यात्रेत थेट फुटपाथवर आपला व्यवसाय थाटला आहे. तीच घासाघीस- तेच सौदे आणि त्यानंतर श्रद्धेने देवी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना चंद्रपूरच्या बांबूच्या टोपल्या देण्यात त्या आनंद शोधत आहेत. वार्धक्य आले तरी आणि मुलगा लोकप्रतिनिधी झाला तरी अम्मांची व्यावसायिक धडपड सुरूच आहे. त्यात काय लाजायचं? कष्टाने समाधान मिळत असेल तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया गंगुबाई जोरगेवार यांनी दिली.


बांबू ताटवे, टोपल्या यांचा पिढीजात व्यवसाय करणारे जोरगेवार कुटुंब आजही आपला व्यवसाय करत आहेत. तेच श्रम, तेच व्यवसाय, तेच कष्ट आणि तोच आनंद ते यातून मिळवत आहेत. आपल्या आईला व्यवसायाच्या ठिकाणी अलिशान वाहनातून सोडणाऱ्या किशोर जोरगेवार यांना या श्रमाचाही प्रचंड अभिमान आहे. याच मातीतले ज्येष्ठ समाजसेवक कै. बाबा आमटे यांनी "श्रम ही है श्रीराम हमारा" हा नारा दिला होता. हीच उक्ती तंतोतंत लागू होत असलेल्या गंगुबाई जोरगेवार यांच्या या धडपडीला सलाम.