चंद्रपूर : राज्यात सत्तांतर होताच मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेनला (Mumbai - Ahmedabad bullet train)आवश्यक त्या सर्व परवानग्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी दिल्या आहेत. देशाच्या प्रगतीत असे प्रकल्प निर्णायक ठरणार आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण बुलेट ट्रेनसारखे प्रकल्प होत असताना राज्यातील ग्रामीण भागातल्या असुविधांकडेही मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावं अशी अपेक्षा सामान्य माणूस बाळगून आहे. राज्यातल्या अनेक ग्रामीण भागात आजही धड रस्ते नाहीत. ग्रामीण भागातील आरोग्ययंत्रणा तर अद्याप धापा टाकत असल्याचं चित्र आहे.


याचंच एक मन हेलावून टाकणारं उदाहरण पाहिला मिळालं.  तापाने फणफणलेल्या चिमुकल्याला घेऊन बाप पुरात चक्क शिरला. चंद्रपूरच्या गोंडपिपरी तालुक्यात ही घटना घडली आहे.  


सलग 5 दिवसाच्या पावसानं वर्धा आणि पैनगंगा नदिला पूर आलाय. या पुराचं पाणी पोडसा गावातही शिरलंय.. शामराव  गिनघरे यांचा मुलगा कार्तिकला ताप आला होता. त्यात गावात आरोग्य सुविधा नसल्यानं शामराव मुलाला घेऊन पुराच्या पाण्यातून निघाले. तब्बल 5 किलोमीटर पायी चालत त्यांना मुलाला खासगी रुग्णालयात न्यावं लागलं.



एकीकडे महासत्ता होण्याचं स्वप्न पाहात असताना ग्रामीण भागातलं हे दृष्य नक्कीच विचार करायला लावणारं आहे.