चंद्रपूर : चंद्रपूरमध्ये अवैध दारू भरलेल्या वाहनाने पोलीस उपनिरीक्षकाला चिरडलंय. उपचारादरम्यान पोलीस उपनिरीक्षक छत्रपती किडेंचा मृत्यू झालायय. ते नागभीड पोलीस ठाण्यात कार्यरत होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटे चार वाजताच्या सुमारास ही घटना घडलीय. छत्रपती किडे मौशी चोरगावजवळ गस्तीला गेले होते. एका वाहनात अवैध दारू भरली असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. त्यामुळे पोलीस या मार्गावर तैनात होते.


गस्तीवर असतानाच भरधाव आलेल्या वाहनानं त्यांना उडवलं. जखमी अवस्थेत उपनिरीक्ष किडे यांना ब्रम्हपुरी येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला.