तेजस ठाकरेंना ताडोबात प्रवेश नाकारला आणि...
तेजस यांनी मुंबईतून वजन वापरून विशेष अतिथी दर्जा मिळवत ताडोबाची भ्रमंती केली.
चंद्रपूर : ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सफारीला आलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे चिरंजीव तेजस ठाकरे यांना ताडोबा व्यवस्थापनानं नि:शुल्क प्रवेश नाकारला. मात्र तेजस यांनी मुंबईतून वजन वापरून विशेष अतिथी दर्जा मिळवत ताडोबाची भ्रमंती केली.. ताडोबामध्ये दिवसभर प्रवेशासाठी नियमानुसार ३० हजार रुपये शुल्क जमा करावे लागतात.. नियमानुसार तेजस यांना ताडोबात नि:शुल्क प्रवेश अशक्य होता.. मात्र तेजस यांनी मुंबईत संपर्क साधून आपण वनविभागाचे अतिथी असल्याचे पत्र ताडोबा व्यवस्थापनाला पाठवले. यानंतर तेजस यांच्या नि:शुल्क प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला.. नुकतंच ताडोबात काळ्या बिबट्याचं दर्शन झालंय.. या बिबट्याला पहाण्यासाठी तेजस ठाकरे ताडोबाला आले होते. मात्र काळ्या बिबट्याचं दर्शन न झाल्यानं त्यांची निराशा झाली.