विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या (Chatrapati Sambhaji Nagar) ओव्हर गावात एका 17 वर्षांच्या मुलीने आपलं जीवन संपवलं. स्थानिक रोडरोमिओच्या (Rodromeo) छळाला कंटाळून तीने जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. दहावीत तीला 96टक्के मार्क मिळाले होते. डोळ्यात स्वप्न होतं डॉक्टर बनण्याचं. लोकांची सेवा करण्याचं. मात्र एका रोडरोमिओने तीच्या या स्वप्नांचा भंग केला. रोडरोमिओच्या छळाला कंटाळून डॉक्टर बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या या मुलीनं मृत्यूला कवटाळलं..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सतरा वर्ष पूजाच्या आत्महत्येला (Suicide) आता तीन दिवस झाले मात्र अजूनही तिचे कुटुंब आरोपिंच्या दहशतीतुन बाहेर निघू शकलं नाही,  पूजा गेली मात्र अजूनही आरोपी छळत असल्याचा त्यांचा आरोप आहे,  याबाबत समाज माध्यमांवर त्यातील एका आरोपीचा घटनेच्या दिवशीचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय, त्यात तो आरोपी 'आज जेल, कल बेल... फिर वही पुराना खेल' असं म्हणताना दिसत आहे. ही मग्रुरी इथेच थांबत नाही. तर काही आरोपी घराबाहेर तलवार घेऊन फिरतात. रात्रीच्या वेळी घराबाहेर बाईकचा मोठमोठ्याने आवाज करतात. तसंच ज्या मुलीने आत्महत्या केली तीच्या भावाला मारायचीही धमकी दिल्याचा आरोप कुटुंबीयांनी केलाय.


पूजाने उचललं टोकाचं पाऊल
पूजा ज्या  गावात राहत होती याच गावातील एक तरुण तिचा छळ करत होता असा कुटुंबीयांचा आरोप आहे. तिच्या भावाला आई-वडिलांना मारण्याची धमकी देत होता. त्यातूनच पूजाने टोकाचे पाऊल उचललं आणि घराजवळच्याच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आम्हाला न्याय द्यावा आणि या सर्व आरोपींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी पीडितेचे कुटुंब करत आहे.


पूजा गेल्या वर्षी दहावी पास झाली होती तिला 96% मिळाले होते डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न होतं. मात्र हे स्वप्न आता भंगलय तिला न्याय मिळावा आणि दोषींवर कारवाई व्हावी यासाठी संभाजी नगरात गेली 2 दिवस सतत आंदोलन सुरू आहे. पोलिसांनी ही गुंडगिरी ठेचावी आणि मुलींना सुरक्षित करावे इतकीच या सर्वांची मागणी आहे


खुलेआम धमकी देण्याचा हा माज येतो तरी कुठून? पोलीस ही मग्रुरी कधी ठेचणार? असा सवाल स्थानिकांनीही विचारलाय. धमकी दिलेल्या व्हायरल झालेल्या व्हिडिओची शहानिशा सुरू असल्याचा दावा पोलीस करतायत.. संभाजीनगरच्या पोलिसांनी आता खाकीचा धाक दाखवत या आरोपींचा माज ठेचून काढावा, जेणेकरून संभाजीनगरच्या अनेक तरुणींचा जीव वाचवता येणार..