पुणे : स्वराज्यरक्षक संभाजी राजांचा आज ३३८ वा राज्याभिषेक दिन. यानिमित्ताने पुण्याजवळ तुळापूर इथं राज्याभिषेक सोहळा रंगला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तुळापूरमध्ये संभाजी राजांची समाधी आहे. राज्यभिषेक दिनाच्या निमत्ताने तुळापूर गावातून संभाजी राजांची पालखी काढण्यात आली. त्यानंतर शंभूवंदना होऊन महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालण्यात आला.


या सोहळ्यासाठी शंभूभक्त मोठ्या संख्येंन सहभागी झाले होते. असं असलं तरी यंदाच्या सोहळ्यावर कोरेगाव भीमाच्या अनुचित घटनेचं सावट होतं. कायदा सुव्यस्थेचा भाग म्हणून सर्वत्र मोठा पोलिस बंदोबस्त होता.