आरोग्य खात्यातला `मुन्नाभाई` वैद्यकिय शिक्षण नसतानाही चक्क 5 वर्ष आरोग्य अधिकारी म्हणून सेवेत
सिल्लोडमध्ये एक बोगस डॉक्टर तब्बल 5 वर्षे सरकारी सेवेत कार्यरत होता.. कोणतंही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तो रुग्णांची तपासणी करत होता.. तसच त्यांच्यावर उपचारही करत होता.
छत्रपती संभाजीनगर : एक अत्यंत धक्कादायक बातमी छत्रपती संभाजीनगर (Chatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातून समोर आली आहे. सिल्लोडमध्ये (Sillod) एक बोगस डॉक्टर (Fake Doctor) तब्बल 5 वर्षे सरकारी सेवेत कार्यरत होता. कोणतंही वैद्यकीय शिक्षण नसतानाही तो रुग्णांची तपासणी करत होता.. तसच त्यांच्यावर उपचारही करत होता.. मोहसिन खान शेरखान पठाण असं त्याचं नाव आहे. आरोग्य विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या बोगस डॉक्टरचा पर्दाफाश झालाय. त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात (City Chowk Police) गुन्हा दाखल करण्यात आलाय. बनाव उघडकीस आल्याचे कळताच तो फरार (Absconded) झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत..
पाच वर्ष वैद्यकीय सेवेत
कोणतेही वैद्यकीय शिक्षण (Medical Education) नसतानाही तब्बल पाच वर्षे आरोग्य विभागात (Department of Health) हा बोगस डॉक्टर तालुका आरोग्य अधिकारी म्हणून काम करत असल्याचं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडमध्ये समोर आलंय. डॉक्टर नसतानाही रुग्णांची तपासणी करून उपचारही केले. आरोग्य विभागाने कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर या तोतया डॉक्टरचा पर्दाफाश झाला. मोहसिन खान शेरखान पठाण असं त्याचं नाव आहे. त्याच्यावर सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. 2019 पासून तो कार्यरत होता. या पदासाठी किमान शैक्षणिक पात्रता 'बीएएमएस' उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे.
मोहसिन खान याने पदवीचे प्रमाणपत्रही सादर केलं होतं. मात्र, तपासणीत ते प्रमाणपत्रच बनावट असल्याचे सिद्ध झाले. सिटीचौक पोलिस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल होताच तपास अधिकारी उपनिरीक्षक उद्धव हाके त्याच्या शोधासाठी रवाना झाले. त्याच्या मूळ गावीदेखील शोध घेतला. आपला बनाव उघडकीस आल्याचे कळताच तो पसार झाला. मात्र, 5 वर्षे एका तोतया डॉक्टरने प्रशासनाच्या सेवेत आरोग्य अधिकारी म्हणून काम केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
वैद्यकीय शिक्षण न घेता रुग्णांवर उपचार करणारे अनेक बोगस डॉक्टर सध्या राज्यात सक्रीय आहेत. अशा बोगस डॉक्टरांना शोधून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कोल्हापूरात मृत अर्भक आढळल्याने खळबळ
कोल्हापूर शहरातील सीपीआर हॉस्पिटल आवारात 2 मृत अर्भकं आढळून आली आहेत. या घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात खळबळ उडाली आहे. ही दोन्ही अर्भकं भटक्या कुत्र्यांनी हॉस्पिटल परिसरात आणली असल्याची प्राथमिक माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे. सीपीआर हॉस्पिटल शेजारी लागून असणाऱ्या कोंडाळ्यात अज्ञातांनी 2 अर्भके टाकल्याचा पोलिसांचा संशय आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.