चेतन कोळस, झी मीडिया, येवला, नाशिक : भुजबळांसह तीन-तीन विद्यमान आमदार असूनही येवल्यातील समस्या काही सुटत नाहीत. वर्षानुवर्षे मागण्या करूनही रस्ते, वाहतूक कोंडीसारखे प्रश्न जैसे थे आहेत. पैठणीमुळे ओळख असणाऱ्या येवला शहराची राष्ट्रवादीचे हेविवेट नेते छगन भुजबळ यांचा मतदारसंघ म्हणून एक वेगळी ओळख आहे. दरम्यान, तीन विद्यमान आमदारांचं गाव म्हणून नवी ओळख असणाऱ्या येवला शहरातील समस्या मात्र सुटण्याऐवजी वाढतच आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, शिक्षक आमदार किशोर दराडे, स्थानिक स्वराज्य संस्था आमदार नरेंद्र दराडे असे तीन लोकप्रतिनिधी असतानाही येवला शहरातील मूलभूत समस्याही सुटू शकलेल्या नाहीत. स्वछता, पिण्याचे पाणी, आरोग्य, रस्ते, शहरात आणि चौफुलीवरील होणारी वाहतूक कोंडी, नगरपालिकेचा भोंगळ कारभार अशा एक ना अनेक समस्या शहरवासीयांना भेडसावत आहेत.


समस्या ग्रस्त, येवला शहराच्या समस्या कधी आणि कोण सोडवणार असा प्रश्न शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे विकासाचा बॅकलॉग भरुन काढणार असल्याचं शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी सांगितलंय.


महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे. त्यामुळे केवळ आश्वासनं मिळतात की खरंच समस्या सुटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.