`दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो`
छगन भुजबळ यांनी भाजपवर तोफ डागली आहे.
नंदुरबार / धुळे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षचे नेते छगन भुजबळ यांनी आपल्या नंदुरबार जिल्हा दौरत विरोधकंवर जोरदार हल्ला चढवला दिल्लीची ईडा आणि राज्यातील पीडा टळो आणि शेतकऱ्यांचे राज्य येवो, अशा दीपावलीच्या शुभेच्छा देत राष्टवादीचे नेते छगन भुजबळ यांनी भाजपवर तोफ डागली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमीभावच्या आश्वासनाची मिमिक्री करत त्यांनी चांगलीच खिल्ली देखील उडवली.
आपण मनुस्मृती जाळल्याने आपल्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली असून माझे जे करायचे ते करा, मी धमक्याना घाबरत नसल्याचे सांगत, मला कितीही धमक्या दिल्या तरी मी थांबणार नाही, असे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले. नंदुरबर जिल्ह्यातील शहाद्यातील बाजार समीती आवारात त्यांच्या उपस्थितीत समता परिषदेची समता सभा झाली. या सभेत त्यांच्या हस्ते मनुस्मृती जाळुन निषेध करण्यात आला.
यावेळी संभाजी भिडे गुरुजी यांच्यावर सडकून टीका केली. ज्यांनी मोदींना गोधरा घटनेत मदत केली. त्यांनाच आज दिल्लीत महत्वाची पदे दिली जात असल्याचे सांगत आपल्याला नाहक अडीच वर्षे जेलमध्ये टाकल्याचे सांगितले. युतीच्या सरकारमध्ये विरोधीपक्ष नेते असतांना आपण सरकार विरोधात उठवलेल्या आवाजाने त्यांचे सरकार पडले होते. हिच भीती ओळखून सध्याच्या भाजप सरकारने खोट्या गुन्ह्यांमध्ये गोवत आपल्याला जेलमध्ये डांबल्याचा आरोप देखील भुजबळ यांनी केला आहे.
सत्ताधारी आणि तपास यंत्रणावर टीका करताना भुजबळ यांची जीभ घसरली. तपास यंत्रणेने अनेकवेळा घराची चौकशी केली. याचा कुटुंबाला प्रचंड त्रास झाला हे सांगताना त्यांची चुकीचा शब्द प्रयोग केला. धुळे जिल्ह्यातील सोनगीर गावात समता परिषदेच्या मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यानी केंद्र आणि राज्य सरकारवर चौफेर टीका केली. यावेळी भुजबळ यानी मनुस्मुर्ती जाळत आपण ब्राम्हण विरोधी नसून मनुवदाच्या विरोधात असल्याचे स्पष्ट केले.